विषय : प्रत्येक कोल्ड्रिंक वरील MRP पेक्षा 5/- रुपये जास्त घेण्याबाबत.
पेण खोपोली बायपास वरील हॉटेल मालक: प्रभाकर विठ्ठल पाटील ( ) या हॉटेल मध्ये असणारे मालक - मालकीण हे जनतेची जाणूनबुजून फसवणूक करीत आहेत. प्रत्येक कोल्ड्रिंक मागे 5/- जास्तीचा दर लावून त्यांनी दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी रिओ कॅन ( कोल्ड्रिंक ) या वस्तूवर 40/- MRP असून दुकान मालकांनी 45/- रुपये घेतले तरी ग्राहकाने 5/- जास्तीचे का घेताय असे विचारल्यास तुम्हाला ही वस्तू घ्यायची असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या अशा शब्दात उत्तर दिले.
परत दिनांक : 7 मे 2022 रोजी ग्राहक : अजिंक्य वाघचौरे हे त्याच हॉटेल मध्ये कोल्ड्रिंक घेण्याकरिता गेले असता पुन्हा त्याने 5/- रुपये जास्त घेतले, या ग्राहकाने या विषयी जाब विचारला असता आम्ही प्रत्येक कोल्ड्रिंक मागे 5/- रु. जास्तच घेतो असे ठणकावून सांगितले.
दिनांक : 8 मे 2022 पुन्हा (ग्राहक: प्रथमेश वडके ) यांच्या कडून सुद्धा कोल्ड्रिंक मागे 5/- जास्त घेतले व त्याचे कच्चे बिल सुद्धा दिले आहे, तसेच योगेंद्र वीरकर यांच्या कडूनही ( MAZA मँगो ज्यूस ) मागे 5/- रु. जास्त घेतले.
महाराष्ट्र कामगार सेना,ता. पेण, जि. रायगड. यांनी ग्राहकाच्या वतीने विचारपूस केली असता ( आम्हाला आमचे डिस्ट्रिब्युटर ) तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मागे जास्त पैसे घ्या असे उत्तर दिले आहे. हे उत्तर आम्ही ऐकून तेथून निघून जात असताना हॉटेल मालक यांची पत्नी यांनी आमचे पदाधिकारी समजावत असताना यांच्या हातातून कोल्ड्रिंक चे तेच बिल जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रकरणातील आजचे दि : 8 मे 2022 रोजीचे सर्व पुराव्यांची प्रत या निवेदनासोबत देत आहोत, तसेच लागल्यास या सर्व प्रकरणाची पूर्ण व्हिडीओ आमचे येथे मोबाईल मध्ये पुरावा म्हणून जतन ठेवली आहे, जेणेकरून आदरणीय ग्राहक मंच यांनी हॉटेलवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि जनतेची होणारी फसवणूक बंद करावी ही नम्र विनंती.
Share this complaint with your Friends: